विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्य दिनाचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
समाचार टीम
आजादी का अमृत महोत्सव निमित्त भारतीय स्वातंत्र्यदिन कै. साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नंबर -१ नगर परिषद करमाळा या शाळेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला. नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून शाळेने समूह राष्ट्रगीत गायन, हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी, प्रभात फेरी, माता पालक मेळावा, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, अर्थसाक्षरता, मोबाईलचे दुष्परिणाम, बचतीची सवय सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्य दिनाचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

शाळेतील विद्यार्थिनींची थोर महापुरुषांच्या वेशभूषेतील निघालेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेचा ध्वजारोहण कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री दयानंद चौधरी यांच्या शुभहस्ते झाला.स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल फंड, शाळेचे पालक तथा नगर सेविका स्वातीताई फंड, पालक तथा नगरसेवक नवनाथ राखुंडे, माजी उपनगराध्यक्ष नारायण (बापू) जगताप, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते तथा शाळेचे पालक श्री सचिन काळे तसेच शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी,पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संध्या शिंदे यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार भाग्यश्री पिसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकला टांगडे, सुवर्णा वेळापुरे, भालचंद्र निमगिरे, सुनिता क्षिरसागर, रमेश नामदे, मोनिका चौधरी, तृप्ती बेडकुते, निलेश धर्माधिकारी या शिक्षकांनी घेतले.