मांगी येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या आनंदात साजरा
समाचार टीम
स्वातंत्र्याची 75 वर्षे अमृत महोत्सव वर्षानिमित्त मांगी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले, यामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. सकाळी मांगी गावचे उपसरपंच श्री नवनाथ बागल यांच्या हस्ते सरपंच निर्मला काकू बागल ग्रामपंचायत सदस्य तात्या शिंदे , कु स्नेहल अवचर , प्रतिनिधी आदेश बागल सह ग्रा सदस्य , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ उज्वला पाटील , उपाध्यक्ष , सर्व सदस्य तसेच शिक्षक वृंद, समस्त गावकरी यांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले.

नंतर गावामध्ये हलग्यांच्या निनादात प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये चिमुकल्यांनी लेझीम खेळत गावकऱ्यांचे मने जिंकली. तसेच हुबेहूब राष्ट्रपिता महात्मा गांधींजी सारखा कु वरद सुदेस् बागल् या विद्यार्थ्यांचा मेकअप करण्यात आला होता. माता जिजाऊ कु दिव्या गायकवाड, स्व इंदिरा गांधी कुमारी उत्कर्षा बागल, पंडित नेहरू स्वराज पाटील , भारत मातेचा कु, स्वरा प्रवीण अवचर या चिमुकली चा मेकअप चे मुख्य आकर्षण होते. हुबेहूब वेशभूषा साकारण्यात आल्यामुळे गावकऱ्यांनी या चिमुकल्याण सोबत भरपूर सेल्फी काढल्या.

अतिशय शिस्तबद्ध नियोजन मुख्याध्यापक श्री संतोष पोतदार यांचे सह, सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेऊन केले होते. प्रभात फेरी नंतर चिमुकल्यांची हिंदी मराठी आणि इंग्रजी मध्ये देशभक्तीपर भाषण झाली. या भाषणाला विद्यार्थ्यांच्या पालकांसह समस्त गावकऱ्यांनी प्रचंड दाद देत चिमुकल्यांचा उत्साह वाढवला. यासाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री संतोष पोतदार , शिक्षिका सौ सुवर्णा महामुनी यांनी मुलांचे लेझीम बसवले होते.
सौ पवार मॅडम यांनी मुला मुलींच्या वेशभूषा साठी विशेष मेहनत घेतली. सौ आशा देमुंडे व उपशिक्षक श्री हीरामन् कौले यांनी विद्यार्थ्यांच्या भाषणाची तयारी करून घेतली होती. या नेत्रदिपक अशा कार्यक्रमाची समस्त मांगी ग्रामस्थांनी भरभरून प्रशंसा केली. कार्यक्रमासाठी मांगी गावातील पालकांसह समस्त ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.