करमाळासोलापूर जिल्हा

तालुक्यातील शेतकऱ्यांवर वीज कपातीचे संकट ; पहिल्या टप्प्यात सहा सबस्टेशनवर वीज कपात

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात साजरी करण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यावर येणार आहे. नुकतच महावितरणच्या वतीने वीज कपात करण्यास सुरुवात केली आहे. मागील थकबाकी वसुलीसाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी आंदोलने केल्यानंतर व तात्पुरता भरणा करून घेऊन महावितरणने सवलत दिली होती. त्यानंतर आठ तास वीज करण्यात आली होती.

त्यावेळेस महावितरणचे अधिकारी सुमित जाधव यांनी जाहीर केले होते की, सदरची थकबाकी वसुली मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली आहे. उर्वरीत थकबाकी वेळेत न भरल्यास पुन्हा एकदा वीज कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी घोषणा केली होती. परंतु त्याकडे शेतकऱ्यांनी तितकस गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसून येत नाही.

आधीच कोळशाचे संकट निर्माण झालेले असताना थकबाकी शिल्लक ठेवणे हे महावितरणला न परवडण्यासारखे गणित होऊन बसले आहे. त्यामुळे महावितरणच्या वतीने कडक पावले उचलणे जाण्याची शक्यता होती. त्या पद्धतीने आता तालुक्यात सहा सबस्टेशन पासुन सुरुवात झाली आहे . सुरुवातीला मांजरगाव, कात्रज, जिंती, हिंगणी, वाशिंबे, पारेवाडी हे सबस्टेशन या यादीत येत आहेत त्याप्रमाणे यांना फक्त दोन तास वीज दिली जाणार आहे. त्यानंतर हळुहळु इतर भागातही वीज कपात केली जाणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE