व्यावसायिकांच्या प्रश्नावर भाजपा व्यापारी आघाडी आक्रमक होणार
करमाळा समाचार
भारतीय जनता पार्टी करमाळा शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी जितेश कटारिया यांची नियुक्ती करण्यात आली.नियुक्तीची घोषणा पक्षाचे जिल्हा संघटक धैर्यशील भैय्या मोहिते पाटील , तालुका अध्यक्ष गणेश चिवटे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, सोलापूर विद्यापीठ सिनेटचे दिपक चव्हाण, अमर साळुंखे, नरेंद्र ठाकूर व इतर पदाधिकार्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

व्यापारी, व्यावसायिक व लघु उद्योजकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष कटिबध्द असून त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. यावेळी श्री. जितेश कटारिया म्हणाले.

पुढे बोलताना कटारिया म्हणाले, शासनाच्या धोरणामुळे व्यापारी व्यावसायिक अडचणीत आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू असताना शासनाने अद्यापपर्यंत कोणतेही दिलासादायक निर्णय घेतलेले नाहीत. नुकतेच विजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आलेले आहेत. हे दर अन्यायकारक आहेत. कोरोनामुळे व्यवसाय उद्योग अडचणीत आहे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत अशा स्थितीत मोठी आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. मात्र राज्य शासनाने कोणताही दिलासा न देता विजेची बिले वाढीव दराने दिली आहेत. त्यासाठी भाजप तर्फे पुढील आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आणि व्यापारी वव्यावसायिक वर्गाला दिलासा द्यावा. येणाऱ्या काळामध्ये शहर व्यापारी आघाडीच्या कार्यकारिणी मधून सर्व प्रकारच्या तरुण व्यावसायिकांना प्रतीनिधित्व देऊन काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
यावेळी भाजपा चे सर्व आजी माजी पदाधिकारी व मित्र परिवार उपस्थित होता.