करमाळ्यात आयसीआयसीआय बॅंकेशेजारी ओढ्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
प्रतिनिधी –
करमाळा शहरातील आयसीआयसीआय बँकेच्या शेजारी वाहत असलेल्या नाल्यांमध्ये एका अनोळखी व्यक्तीचे मृत शरीर आढळून आले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून हे त्याठिकाणी असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्या ठिकाणी पोलिसांना माहिती मिळाल्यावर सदरचे मृत शरीर हे पुढील कार्यवाहीसाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

आज सकाळी साडेनऊच्या सुमारास काही लोकांनी एक मृत शरीर आयसीआयसीआय बँकेच्या शेजारी असलेल्या ओढ्यात पडल्याचे दिसून आले. त्यावेळी येथील नागरिकांनी करमाळा पोलीस ठाण्यात संपर्क केला. यावेळी करमाळा पोलीस संतोष देवकर व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. काही स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांनी नाल्यात पडलेला त्या व्यक्तीचे मृत शरीर ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवले आहे.

सदरची मृत शरीर चार ते पाच दिवसांपासून त्या ठिकाणी पडलेली असल्याने ओळख पटण्यासाठी अवघड झालेले आहे. त्याशिवाय त्याच्यावर ओळख पटावी असे कोणतीही चिन्ह नसल्याने सदर चे शरीर हे कोणाचे आहे हे माहिती काढणे पोलिसांसाठी एक प्रकारचे आव्हान असणार आहे.
मृत शरीर बघुन खून असावा अशी चर्चा सुरु झाली. ती चर्चा थोड्याच वेळात शहरात पसरली. यावरून करमाळ्यात खुन झाला अशी चर्चा रंगली होती. पण सदरचा प्रकार हा खुनाचा नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.