कोळगाव सब स्टेशन वरील जळालेला ट्रान्सफॉर्मर एका महिन्यात होणार कार्यान्वित
करमाळा समाचार – संजय साखरे
पुर्व भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कोळगाव सब स्टेशन वरील ट्रान्सफॉर्मर जळाला असल्याने गत उन्हाळ्यात फक्त ४ तास विद्युत पुरवठा होत होता परीणामी शेतकर्यांचे अतोनात हाल व नुकसान झाले. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुर्व भागातील शेतकऱ्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना हिवरे येथील प्रवेशाच्या कार्यक्रमात विनंती केली असता आज सोलापूर येथे जिल्ह्याचे महावितरण चे मुख्य अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या सोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला.

एका महिन्यात ट्रान्सफॉर्मर चालू करू असे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी सांगितले. या प्रसंगी चोभे पिंपरी चे सरपंच विक्रम उरमोडे, तानाजी बापू झोळ, बाळासाहेब जगदाळे,भरत भाऊ अवताडे, मानसिंग भैय्या खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ सर,हिवरे चे माजी सरपंच उमेश मगर, मिरगव्हण चे सरपंच पांडुरंग हाके, अर्जून नगर चे सरपंच प्रकाश थोरात, आबासाहेब सांडगे रामचंद्र पवार श्रीराम निळ आदी उपस्थित होते.
