करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मृताची ओळख पटली ; खुन करुन पुरावा नष्ट करण्याचा होता प्रयत्न

करमाळा समाचार

अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर मांगी रोडने जात असताना आयटीआय परिसरात शंभर फुट आत मध्ये एक स्विफ्ट गाडी उभी होती. त्यामध्ये एक युवकाचे मत शरीर मिळून आले होते. त्याचा आता शोध पोलिसांनी घेतला असून अवघ्या चार ते पाच तासात संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती काढण्यात पोलिसांना यश आले आहे. श्रावण रघुनाथ चव्हाण वय ४० रा. (adsuregaon) अडसुरेगाव ता. येवला जिल्हा नाशीक. असे त्या युवकाचे नाव आहे.

प्राथमिक अंदाजानुसार संबंधित व्यक्तीला जिवे ठार मारून त्या ठिकाणी आणल्याची माहिती मिळत आहे. सदरचे खून हा अनैतिक संबंधातून खुन झाला आहे. याबाबत पोलीस तपास घेत आहेत. मृताच्या नातेवाईकांना सदरच्या घटनेबाबत माहिती मिळताच त्याचे बंधू व इतर नातेवाईक हे करमाळा येथे पोहोचले आहेत. तर पोलीस खुन्यांच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मागील तीन दिवसांपासून सदरचे मृत शरीर हे कारगाडीतच असल्याने सध्या त्या शरीराची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. चेहरा पट्टी ओळखणे कठीण झाले आहे. तर शरीरावर कोणते घाव वगैरे काय आहेत का हे तपासणी करणे अवघड जात आहे. त्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील अहवाल येईपर्यंत नेमका मृत्यू कशामुळे झाला हे सांगणे कठीण असले तरी पोलिसांचा शोध योग्य दिशेने चालू असल्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी सांगितले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE