करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

शेतकरी घराच्या मागे शेतात काम करण्यासाठी गेला ; याचाच फायदा अज्ञात तिघांनी उचलला

करमाळा समाचार – karmala crime

शेतीची कामे करत असताना घरातील सर्व मंडळी शेतात गेल्यानंतर कंदर ता. करमाळा येथील राजेंद्र विक्रांत भोसले यांच्या घरी अज्ञात तीन चोरांनी घराच्या कोयंडा तोडून आत प्रवेश करत चोरी केली आहे. यावेळी एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांनी घेऊन पसार झाले आहेत. सदरचा प्रकार ९ एप्रिल दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र भोसले हे शेतकरी कंदर येथे शेती करून आपली उपजीविका भागवतात. ९ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे सकाळी साडे अकराच्या सुमारास घराच्या पाठीमागे शेतीचे कामाकरिता सर्वजण गेले होते. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास राहते घराच्या मागील विहिरीजवळ पाहिले असता एकजण मोटरसायकलवर जाताना दिसला. तो कोण आहे पाहण्यासाठी घरा जवळ येत असताना आणखीन दोन जण मोटरसायकलवर बसून निघून जाताना दिसले.

यावेळी संशय आल्याने भोसले हे भावासह घराची पाहणी करण्यासाठी आले. त्यावेळी कडी-कोयंडे तुटलेले दिसले. यावेळी आजुबाजूला पाहणी केली असता लक्षात आले की राहत्या घरात चोरी झाली आहे. या वेळी घरात तपासणी केली असता सिद्धेश्वर भोसले व राजेंद्र भोसले अशा दोघांच्याही घरांमधील चोरी झाल्याचे लक्षात आले.

ads

सदर ठिकाणाहुन दहा हजार रोख रक्कम व एक लाखाचे पाच तोळे सोन्याचे दागिने असे एक लाख दहा हजार रुपये घरातून नेल्याचे  दिसून आले. प्रकरणाचा पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE