करमाळासोलापूर जिल्हा

नवीन सब स्टेशन व वाढीव ट्रांसफार्मर ला मंजुरी द्या -आमदार संजय मामा शिंदे

करमाळा समाचार संजय साखरे


करमाळा मतदार संघातील विजेची वाढती टंचाई दूर करण्यासाठी करमाळा तालुक्यातील राजुरी येथे ते ३३/११ के.वी क्षमतेचे नवीन वीज उपकेंद्र निर्मितीला व करमाळा तालुक्यातील सीना बॅकवॉटर परिसरातील कोळगाव येथील सबस्टेशन मध्ये पाच एम .व्ही क्षमतेच्या नवीन वाढीव ट्रांसफार्मर ला व तसेच झरे येथील उपकेंद्रांमध्ये तीन एम .व्ही.क्षमतेच्या वाढीव ट्रांसफार्मर ला मंजुरी द्या अशी मागणी करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

या पत्रामध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, माझ्या करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून देखील उजनी धरणात व सीना कोळेगाव धरणात पुरेसा पाणीसाठा असून देखील शेतकऱ्यांना फक्त सहा तासच वीज मिळत आहे. त्याच बरोबर लोडशेडिंगचे नवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तालुक्यातील राजुरी येथे ते ३३/११के.व्ही क्षमतेच्या नवीन सब स्टेशनला मंजुरी व कोळगाव आणि झरे येथे वाढीव ट्रांसफार्मर ला त्वरित मंजुरी द्या . त्यामुळे शेतकऱ्यांना वीज टंचाईचा सामना करावा लागणार नाही. असे त्यांनी पत्रात म्हटले आहे .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE