ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला दिवस वाया जाण्याची शक्यता ; अद्याप एकही अर्ज दाखल नाही
करमाळा समाचार
निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्याच दिवशी सर्व डाऊन व इतर अडचणींमुळे अर्ज दाखल करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे भावी ग्रामपंचायत सदस्यांचा हिरमोड होऊ लागला आहे. अवघ्या सहा दिवसांच्या कालावधीत पहिल्याच दिवशी अशा पद्धतीने ऑनलाईन अडचण आल्याने ऑफलाइन अर्ज स्वीकारावे अशी मागणी होत आहे.

करमाळा तालुक्यातील सोळा मोठ्या ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये जेऊर, कावरवाडी, रामवाडी, भगतवाडी, राजुरी, उंदरगाव, चिखलठाण, गौडरे, कंदर, कोर्टी, निंभोरे, केतुर, वीट, घोटी, रावगाव, केम, रिटेवाडी, मांजरगाव, तरडगाव आदी गावांचा समावेश आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून ते विविध टेबलच्या माध्यमातून करमाळा पंचायत समितीच्या हॉलमध्ये जमा करण्याचे आजपासून सुरुवात करण्यात आले आहे. परंतु सकाळपासूनच ऑनलाईन प्रक्रियेला अडचण आल्यामुळे अर्ज भरणे होऊ शकले नाही. त्यामुळे आतापर्यंत तरी एकही अर्ज दाखल झालेला नाही.
सहा दिवसांचा कालावधी त्यात पहिल्याच दिवशी अशी अडचण अशी अडचण पुढेही चालू राहू शकते. त्यामुळे सदरच्या अर्ज ऑफलाईन घेण्याची विनंती सदस्यांकडून केली जात आहे. यावेळी रावगावचे माजी सरपंच दादासाहेब जाधव यांनीही नाराजी व्यक्त केली.