करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आदिनाथचा निवडणूकीचा बिगुल वाजणार ? ; सध्या प्रशासक मंडळ कामकाज पाहतय

करमाळा समाचार

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाची मुदत संपलेली असताना नव्या संचालक मंडळाच्या नियुक्तीसाठी निवडणूक खर्च न झाल्यामुळे त्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. तर आता पुन्हा नव्याने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर यांनी पुन्हा एकदा निवडणूक खर्चाची मागणी केल्याने निवडणूक जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी कारखान्याच्या संचालक मंडळाची 30 डिसेंबर 2022 रोजी मुदत संपुष्टात आली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे आदेशान्वये यापूर्वी पत्र देऊन निधी भरणे बाबत सूचना करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने दहा लाख इतका भरणा करण्यात आला आहे. तर अद्यापही 25 लाख 29 हजार रुपये येणे बाकी आहे. सदरची भरणारक्कम न केल्याने संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आलेले होते. परंतु अद्याप सदरची रक्कम भरणा केलेली नाही.

निवडणूक घेणेबाबत प्राधिकरणाने सक्त सूचना दिलेल्या असून तात्काळ निवडणूक खर्च निधी भरणे आवश्यक आहे. तरी तात्काळ उर्वरित निवडणूक निधी भरणा करण्यात यावा. जेणेकरून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करता येईल व नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईल अशी आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र आदिनाथ प्रशासकीय अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.

मागील वेळी रक्कम न भरल्यामुळे रखडलेली निवडणूक यांना प्रशासक मंडळ सदरची रक्कम भरून निवडणूक विलास सामोरे जातील का ? किंवा असेच आदिनाथ ची घोंगडे भिजत राहील. याकडे लक्ष लागून राहिले आहे. नुकताच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर पेटला असून कारखाना सुरळीत चालू होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तर यासर्व गोंधळात यंदाचा हंगाम कशा पद्धतीने पार पडेल असाही प्रश्न आहे.

यासंदर्भात कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री बागनवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप असे पत्र मिळाले नसल्याचे सांगितले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE