निवडणुका असतानाही पुढाऱ्यांना गावबंदी करणारे पहिले गाव ; वातावरण तापतय
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात सध्या सोळा गावांमध्ये निवडणुका असल्यामुळे त्या ठिकाणचे वातावरण पाहता सकल मराठा समाजाच्या वतीने पुढार्यांना गावबंदी पुकारलेली नसल्याचे दिसून येते. पण आता कंदर येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत निवडणुका असतानाही पुढाऱ्यांना गाव बंदी केली आहे. याबाबतचे निवेदन करमाळा पोलीस ठाण्यात देण्यात आले.

सदरच्या निवेदनावर गोकुळ माने, धनाजी शिंदे, प्रमोद वागज, सिद्धेश्वर गोडसे आदी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. निवेदनात सर्व राजकीय पुढारी यांना गावामध्ये येण्यास बंदी घातली आहे. तर यानंतर गावात बाहेरून येणाऱ्या पुढारी आल्यास काहीही झाल्यास संबंधित राजकीय नेते जबाबदार राहतील असे निवेदनात म्हटले आहे.
