E-Paperसोलापूर जिल्हा

…. म्हणुन मोहिते पाटील हेच आजही जिल्ह्याचे नेते ; गटाचे कामही आदर्शवत

करमाळा समाचार 

आपल्या तालुक्या व्यतिरिक्त इतर कुठेही काहीही करायचं म्हणलं तर स्थानिक गट-तट आली त्यांना विश्वासात घेणे आले. पण मोहिते-पाटलांची पद्धतच वेगळी आहे. त्यांनी स्थानिक गटातटातील नेत्यांपेक्षा लोकांमध्ये जाणे पसंत केले. तशीच पद्धत त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात राबविल्याने आजही त्यांना जिल्ह्याचे नेते म्हणून संबोधले जाते.

सहकार महर्षी स्व. शंकरराव मोहिते पाटील असतील किंवा त्यांच्या नंतर मा. खा. विजय दादा व आता आ. रणजीत दादा यांनी आजही आपला प्रत्येक तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना संपर्कात राहून गट तसाच टिकून ठेवला आहे. करमाळा असेल पंढरपूर असेल माढा व इतर तालुक्यातही त्याठिकाणी गावोगावी मोहिते पाटलांनी आपले जाळे पसरलेले आहे. असा कोणताच तालुका नाही जिथे मोहित गट सक्रिय नाही. काही ठिकाणी त्यांची ताकद कमी असली तरी ते खचुन न जाता काम करत राहतातच निवडणुकाशिवाय इतर वेळीही ते कार्यर्त्याच्या संपर्कात असतात.

मुळातच अनेकांसाठी मोहिते पाटील हाच पक्ष असल्याप्रमाणे राखीव मतदारसंघ असतानाही आजही त्यांच्या माळशिरस मतदारसंघांमध्ये त्यांचा दबदबा कायम आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांना मानणारा वर्ग संपूर्ण त्यांच्या पाठीशी आजही ठामपणे उभा आहे.

मोहिते-पाटील गटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या नेत्यांच्या भरोशावर न राहता स्थानिक छोट्या मोठ्या गटांना सोबत घेऊन प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या कार्यकर्त्या पर्यंत नियोजनबद्ध फळी जास्त चर्चा न करता काम करत असतात. त्याचाच फायदा निवडणुकीच्या माध्यमातून मिळतो. निवडणुकांनंतरही श्रेय लाटण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो. शिवाय कोणालाही स्पर्धक म्हणुन फाजील आत्मविश्वास न बाळगता काम करत राहतात. त्याचेच फळ आताही दिसुन आले.

मुळातच मोहिते-पाटील हे काम करत राहिले व लोक आपोआप त्यांना जुडत गेले. अशातूनच त्यांचा आज सत्तेत दिसून येत असलेला वाटा जरी नसला तरी आजही त्यांना मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग आहे. राष्ट्रवादी सारख्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर फक्त टिकणे नाही तर भाजपा वाढवणे हेही त्यांनी करून दाखवले आहे. त्यामुळे मोहिते हे कोणत्या पक्षावर अवलंबून नव्हते. तर ते स्वतः नेते होते हे त्यांनी प्रत्येक वेळी दाखवून दिले आहे.

करमाळा तालुक्यात मोहिते पाटील हे आजही वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करत राहतात. तसेच लोकांच्या सुखदुःखात एका फोनवर हजर होतात. त्यामुळेच स्थानीक नेत्याप्रमाणे मोहितेंना अनेक जण आपलेच समजात. मागील वेळी सिझर बंद असताना उपजिल्हा रुग्णालयात येऊन पाहणी करुन अपुरी कर्मचाऱी संख्या वाढवण्याच्या सुचना केल्या. तर यावेळी ऑक्सिजन मशीन देऊन आपले योगदान दिले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE