करमाळा पोलिसांची मोठी कामगिरी ; अपघाताचा बनाव केला उघड आरोपींना बेड्या
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे मध्यप्रदेशच्या मुन्ना मालसिंग किराडे (वय ४०) रा. कंजापाणी, पानसेमल, जि बिडवाणी, या उसतोडणी मजुराचा किरकोळ कारणातुन त्याच्या सहकाऱ्यांनी खून केला आहे.पोलिस निरिक्षक श्रीकांत पाडुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ वाघमारे व प्रकाश भुजबळ यांनी मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी तात्या मोरे व रवी वडवी यांच्यासोबत मयत मुन्ना हा दारु पिण्यासाठी गेला होता. हे पत्नीला माहीत होते. जाताना तिघे गेले पण माघारी आले नाहीत. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह मिळुन आला. मृतदेहाच्या कपाळावर, कानावर व चेहऱ्यावर जखमा होत्या. रक्ताने भरलेला मृतदेह आढळल्याने अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले. पण पोलिसांनी कसुन चौकशी केली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे व प्रकाश भुजबळ यांनी तपासाचा वेग वाढवला व दोन फरार आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पत्नीने माहिती दिली की दोन मित्र सोबत गेले होते. मग पोलिसांनी त्यांना शोधून काढले. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला व त्यांनी दारूच्या नशेत आपल्याच मित्राचा खून केल्याचा उघडकीस आले.