करमाळ्यासह इतर भागातील घरफोड्यातील आरोपींना करमाळा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले
करमाळा समाचार
करमाळ्यात दाखल असल्या संशयीत आरोपींना करमाळा पोलिसांच्या डिबी पथकाने बार्शी येथे फिल्मी स्टाईलने पकडले आहे. सदर आरोपींवर करमाळ्यासह वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या आहेत. सदरच्या आरोपींजवळ काही हत्यारेही पोलिसांना मिळुन आले आहेत. यावेळी झटापटीत पोलिसांनी जीवावर खेळुन सदरची कामगिरी पुर्ण केली.

१) अजय श्रावण शिंदे, (२) सुनील श्रावण शिंदे रा. सांजा रोड, धाराशिव यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून बार्शी परिसरात पकडले आहे. त्यांना न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरचे गुन्हेगार अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर धाराशिव जिल्ह्यात 12 गुन्हे दाखल आहेत. करमाळा पोलिसांनी त्यांनी केलेले कुर्डुवाडी, माढा, वैराग येथे केलेल्या घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सरदेशपांडे सो, अप्पर पोलिस अधीक्षक मा हिंमत जाधव सो , मा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो यांच्या मार्गर्शनाखाली मा पो नि जोतिराम गुंजवते सो, पोसई प्रवीण साने सो, पोह/अजित उबाळे, पोना/चंद्रकांत ढवळे, पोशि/तौफिक काझी, अमोल जगताप, गणेश शिंदे , सोमनाथ जगताप आणि सायबर पोलीस स्टेशन कडील पोना/व्यंकटेश मोरे यांनी केली आहे गुन्ह्याच्या पुढील तपास पोसई साने हे करत आहेत.