करमाळासोलापूर जिल्हा

वनविभागाला लोकांच्या जीवापेक्षा बिबट्याचा जीव महत्वाचा ; ठार मारा किंवा आम्हाला परवानग्या द्या !

करमाळा समाचार


तालुक्यात बिबट्याने थैमान घातले असून आतापर्यंत तीन जणांचा बळी तर तीन ते चार जण हल्ला केला आहे. तरीही वनविभाग हा बिबट्याला जिवंतच पकडण्याच्या नादात पुन्हा एकदा त्याला पळून जाण्यात एक प्रकारची मदतच करत आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात भीतीचे वातावरण असून अजूनही लोक दहशतीखाली आहेत. त्यामुळे नरभक्षक बिबट्याला वाचवण्याचा प्रयत्न न करता दिसता क्षणी गोळ्या घालण्यात याव्यात अशी मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष संजय बापू घोलप यांनी केली आहे.

जवळापास ३६ दिवसापासून हा नरभक्षक बिबट्या जालना, बीड, जामखेड परिसरात हैदोस घालुन आता करमाळा तालुक्यात थैमान घालत आहे. त्या परिसरात आठ ते नऊ बळी घेतल्यावरही त्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते पण तरीही त्या भागातहेर त्यांना यश आले नाही. त्यामुळेच आता करमाळा तालुक्यातील तीन जणांचा नाहक बळी गेला आहे. कोणाचा बाप, आई तर कोणाची लाडकी मुलगी आज आपल्यात नाही. हा सर्व कारभार एका बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी केला जात आहे.

मुळातच मारण्याचे आदेशच तालुक्यातील जनतेचा रोष कमी करण्यासाठी दिला आहे का असा संशय व्यक्त केला जात आहे. चारही बाजुंनी घेरा घालुन आता पर्यत शार्प शुटर अद्ययावत हत्यारांसह बिबट्यावर गोळीबार करतात व बिबट्या पळुन जातो मग हे कसले शार्प शुटर आहेत. आता पर्यत जवळपास पाच वेळा गोळीबार करुन बिबट्या मोकाट आहे. मग शार्प शुटर ऐवजी आमच्या तालुक्यातील रान डुकरांची शिकार करणारे चांगले म्हणावे लागतील अशी लाजिरवाण्या अवस्थेत आपण नेऊन ठेवले आहे. मुळातच एका हिंस्त्र प्राण्याला जीवंत पकडण्यासाठी वनविभागाने आपला वेळ आणी आमच्या लोकांचा जीव वाया घालऊ नये वेळीच पकडावे अन्यथा मारुण टाकावे. असे होत नसेल तर आमच्या लोकांना त्याला मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी संजय घोलप यांनी केली आहे. तर पुन्हा आमच्यासह इतर तालुक्यात जाऊन त्याने धुमाकुळ घालु नये याची काळजी घ्या.

ads

 

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE