आत्महत्येचा बनाव करणारा शेअर मार्केट घोटाळ्याचा मास्टरमाइंड अखेर पोलिसात हजर
करमाळा समाचार
तालुक्यातील घोटी परिसरातील शेतकऱ्यांना शेअर मार्केट मध्ये आर्थिक आमिष दाखवून पैसे दुप्पट करून देतो असे सांगत गावातीलच रेवन्नाथ ननवरे सध्या रा. मांजरी बुद्रुक जिल्हा पुणे याने तीन कोटी ३७ लाख रुपयांचा रुपयांचा गंडा घालून पोबारा केला होता तो तब्बल महिण्याने स्वतःहुन हजर झाला आहे. ३० मे २०२४ ते दि ९ ऑगस्ट पर्यत फसवणुक करीत आला होता. याप्रकरणी बाळासाहेब पोपट राऊत यांच्यासह तीस पेक्षा जास्त शेतकऱ्यांन्रे तक्रार दिलेली आहे. त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत अधिक माहीती अशी की, रेवन्नाथ हा आयटी इंजिनिअर म्हणून पुणे येथे नोकरीस आहे. शेअर मार्केटमध्ये त्याने कोट्यावधीची रक्कम गुतवल्याचे भासवले व त्यामध्ये लाखो रुपयाचा परतावा मिळत असल्याचे दाखवून दिले व शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी लोकांना तयार केले. यावेळी गावातील व आसपासच्या शेतकऱ्यांनी मित्र व मित्रांचे नातेवाईक यांच्याकडून लाखो रुपये गोळा केले व ननवरेकडे दिले. सुरुवातीला त्याने काही परतावाही दिला परंतु नंतर परतावा व मुद्दल रक्कम दोन्हीही देण्यास टाळाटाळ करू लागला. यावरून फसवणूक होत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे पैशाचा तगादा लावला. यावेळी त्यांनी सदर रक्कम देतो म्हणून सांगितले.
नंतर तो पुणे येथुन घोटी गावी येतो म्हणाला गावकरी संबंधित ठिकाणी थांबले पण तो गावी आलाच नाही. त्याने ९ ऑगस्ट रोजी आपली गाडी उजनी धरणाच्या जवळ भिमा नदी पुलावर गाडी लावली व त्यामध्ये आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठीही लिहली अशी माहीती शेतकऱ्यांना टेंभुर्णी येथुन कळाली तेव्हा पासुन तो गायब झाला होता. त्यामुळे त्याने बनाव केला असल्याचे लोकांचे म्हणणे होते. अखेर ते आज खरे ठरले ननवरे हा स्वतःहुन करमाळा पोलिसात हजर झाला आहे. पण नियमाप्रमाणे दिसत असलेली रक्कमे पेक्षा जास्त घोटाळा झालेला आहे असे दिसुन येत आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक रोहित शिंदे व करमाळा पोलिस करतील पण आणखी किती लोकांकडुन किती रक्कम गोळा केलीय आणि ती पुन्हा वसुल करणे मोठे आव्हान असणार आहे.