करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

इंजिनियर शैलेश खडके यांना मातृशोक : कै. अंजली मधुकर खडके यांचे अल्पशा आजाराने निधन

करमाळा :

श्री. शैलेश मधुकर खडके यांच्या मातोश्री कै. अंजली मधुकर खडके वय 80 यांचे आज (शुक्रवारी) पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा शिवाजीनगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून, दत्त मंदिराच्या पाठीमागील स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहेत.

कै. अंजली खडके यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, खडके कुटुंबीयांच्या दुःखात नागरिक सहभागी होत आहेत.

भावपूर्ण श्रद्धांजली!

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE