करमाळासोलापूर जिल्हा

ओबीसी आरक्षणासाठी भाजपा रस्त्यावर ; करमाळा येथे आंदोलन

करमाळा समाचार

भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने ओ,बी,सी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 26/ 6 /2021 रोजी मौलाली माळ ,बायपास चौक करमाळा येथे संपन्न झाले.

यावेळी गणेश चिवटे म्हणाले की आंदोलन जे आहे ते महा विकास आघाडीच्या चुकीमुळे 56000 राजकीय पद बंद झाले, त्यामुळे ओ,बी,सी समाजावर राज्य सरकारकडून अन्याय झाला या अन्यायाच्या विरोधात चक्का जामचे एक हजार ठिकाणी आंदोलन पार्टीने करण्यास सांगितले आहे ,ओ,बी,सी समाज आरक्षण मिळेपर्यंत सरकारला सळो कि पळो करून आरक्षण मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही.

यावेळी किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विजयकुमार नागवडे , तसेच शेतकरी संघटनेचे अाण्णासाहेब सुपनवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन शिवाजी बंडगर , व्हि जे एन टी चे जिल्हाध्यक्ष ॲड भगवान गिरीगोसावी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले, समारोप ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे यांनी केला आभार जिल्हा सरचिटणीस किरण बोकन यांनी मानले.

यावेळी उपस्थित महाराष्ट्र चॅम्पियन पै अफसर जाधव ,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे ,तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड ,ओ,बी,सी मोर्चा तालुका अध्यक्ष धर्मराज नाळे ,भाजपा तालुका उपाध्यक्ष दादासाहेब देवकर ,डॉअभिजीत मुरूमकर, मच्छिंद्र हाके , संभाजी शिंदे , दत्तात्रय पोटे , उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब हौसिंग , तालुका चिटणीस आजिनाथ सुरवसे , किरण वाळुंजकर , ओ,बी,सी मोर्चा तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब अनारसे , तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील , ओबीसी मोर्चा तालुका सरचिटणीस भैया गोसावी, प्रज्ञा सेलचे तालुकाध्यक्ष प्रवीण बिनवडे , युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मनोज मुसळे , हर्षद गाडे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ऋषिकेश फंड, तालुका कोषाध्यक्ष चैतन्य पाठक , आदिवासी मोर्चाचे तालुकाध्यक्ष बल्लाळ सर, जिल्हा कार्यकारणी सदस्य चंपावती कांबळे ,युवा नेते युवराज किरवे, विनोद महानवर, अशोक ढेरे , सोमनाथ घाडगे , अशोक मोरे , दादासाहेब काळे, किरण बागल, नितीन निकम , मच्छिंद्र फंड,गोपाळ वाघमारे , भैया कुंभार , प्रकाश क्षिरसागर , कुमार माने , दीपक गुजर, चंद्रकांत राजमाने , संदीप काळे आदी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE