सरपडोहचा वॉटर कप 2018 स्पर्धेतील बक्षिसाचा निधी योग्य कामी खर्ची
करमाळा समाचार
पाणी फाउंडेशन बक्षीस निधीतून ग्रामपंचायत सरपडोह यांच्या कडून वुक्षारोपण व संवर्धनासाठी 6000 लिटर ची पाण्याची टाकी खरेदी करण्यात आली. त्या माध्यमातून गावातील वृक्ष लागवड, काळजी व संवर्धन होण्यास मदत होईल.

याच बक्षीस रक्कम मधून जून 2020 मध्ये गावातील प्रत्येक कुटुंबाला पाच फळ झाडे देण्यात आली आहेत, एकूण 1250 झाडे वाटप केली. तसचे पाणी फाउंडेशन बक्षीस निधीतून सरपडोह गावातील ओडा खोलीकरण करण्यात आले आहे.
या कामी पाणी फाउंडेशन टीम सरपडोह व सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपडोह व ग्रामसेवक, पंचायत समिती करमाळा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
