करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

पोलिस असल्याचे सांगुन तरटगावच्या महिलेला नेले रोशेवाडीकडे अन ..

करमाळा समाचार


ग्रामीण भागातुन करमाळा शहरात कामानिमित्त आलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेची अनोळखी व्यक्तीने पोलिस असल्याचे भासऊन फसवणुक केली आहे. तसेच तीला रोशेवाडीच्या कचरा डेपो कडे नेऊन तीला मारहाण करुन मुद्देमाल लुटुन नेला आहे.

तरटगाव ता. करमाळा येथून करमाळा येथील बक ऑफ इंडीया तसेच तलाठी कार्यालय व इतर ठिकाणी काम असल्याने ती महिला एकटीच आले होते. सर्व कामे आटपून गावी तरटगाव येथे परत जाणे कामी एस टी स्टँड करमाळा येथे गेली. तेथे जाऊन तरटगाव येथे जाणारी एस टी बस किती वाजता आहे. अशी चौकशी केली असता तिला समजले की, दुपारी 4:00 वाजताचे सुमारास तरटगाव येथे जाणारी एस टी बस आहे. त्यानंतर एस टी लागण्यास उशीर असल्याने थोडेसे राहिलेले किराणा सामान घ्यावे म्हणून महिला करमाळा एस टी स्टँड ते भावानी नाका अश्या रोडने चालत जात असताना तिझ्या समोर एक मोटार सायकल त्यावरती इसम अनोळखी इसम बसून आला.

 

महिलेला आडविले त्याचे मोटार सायकलला काठी लावली होती. तो मला म्हणाला की, तुम्ही तोंडाला मास्क लावले नाही. आमची चेकींग चालु आहे. माझे मोठे साहेब पुढे लाल दिव्याच्या गाडीमध्ये पुढे थांबले आहेत. मी पोलीस आहे. तुम्ही गुन्हा केला आहे. तुम्ही माझे सोबत गाडीवर बसा नाही तर तुम्हाला अटक करीन, तुमच्याकडे मला चौकशी करावयाची आहे. असे तो अनोळखी इसम महिलेला म्हणाल्याने घाबरुन त्याचे गाडीवर बसली. त्या अनोळखी इसमाने त्याचे ताब्यातील मोटार सायकल वरती बसवून छुप्या मार्गाने पुणे जाणारे रोडने रोशेवाडी गावाचे पुढे असलेल्या कचरा डेपो जवळ आड बाजूला घेऊन जाऊन गाडी थांबविली. त्यावेळी महिलेने त्याला विचारले पोलीस स्टेशन कोठे आहे. तुमचे मोठे साहेब कोठे आहेत. सरकारी गाडी दिसत नाही. त्यावेळी त्या अनोळखी इसमाने दमदाटी करत गाडीवरुन खाली उतरण्यास सांगितले.

 

महिलेच्या जवळील पिशवी घेऊन त्यामध्ये मध्ये असलेली सर्व कागदपत्रे तपासली. तिला म्हणाला तुझे पाकीट कोठे आहे. मला दाखव असे म्हणाल्याने त्यास माझे पाकीट दाखविले. त्या पाकीटामध्ये ठेवलेले 2000/- रुपये संमती वाचुन काढून घेतले व म्हणाला की, तुझ्या कानातील फुले सोन्याची आहेत का ती काढून मला दे. मी प्रथम देण्यास नकार दिल्यानंतर त्या अज्ञात इसमाने तोंडावर हाताने मारहाण केली. नाहीतर तुझ्या जिवाचे बरे वाईट करीन आजु-बाजुला कोणी नसल्याने मी घाबरुन माझ्या कानातील कर्ण फुले 2 ग्रमची त्यास काढली त्याने बळजबरीने माझे कडून कर्णफुले हिसकावून घेतली. माझ्या पिशवीमध्ये ठेवलेला मोबाईल काढून घेतला व मला धमकी दिली. तु जर याबाबत कोणाला काही सांगितले किंवा पोलीस ठाणेस तक्रार केली तर तुला गाठून जिवे-ठार मारीन अशी मला धमकी दिली व त्याचे ताब्यातील मोटार सायकल घेऊन निघुन गेला ती वेळ दुपारी 4/30 वाजताची होती.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE