शासकीय कार्यालयांची दारे नागरिकांसाठी खुली होत असतानाच बॉन्डच्या तुडवड्याची समस्या
करमाळा समाचार

शासकीय कामकाज, बँक कर्ज प्रकरण, शपथपत्र, करारपत्र आदींसाठी शंभर रुपये बॉन्डचा वापर करण्यात येतो. या बॉन्डवरच सर्व काही लिखित मजकूर समाविष्ट करण्यात येतो. त्यामुळे या बॉन्डला नागरिकांची मागणी आहे. कोरोना परिस्थितीमुळे गेल्या चार महिन्यांपासून नागरिकांची विविध कामे खोळंबली आहेत. आता शासकीय कार्यालयांची दारे नागरिकांसाठी खुली होत असतानाच बॉन्डच्या तुडवड्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

तहसिलदार कार्यालय परिसरात बॉन्ड खरेदीसाठी नेहमीच गर्दी असते. मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदणीकृत करुन देणारी दस्तलेखनिक ही तिथेच आहेत. मात्र त्यांच्याकडून बॉन्ड विक्री बंद ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता एका बॉन्ड रायटरकडे रोज सुमारे दोनशे बॉन्डची मागणी होत आहे. मागणीनुसार बॉन्ड उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
