E-Paperसामाजिकसोलापूर जिल्हा

मराठ्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनाची त्वरीत अंमलबजावणी करावी

12 ऑगस्ट 2020 रोजी मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मराठा आरक्षण साठी आत्मबलिदान दिलेल्या कुटुंबातील प्रत्येकी 10 लाख रुपये आर्थिक मदत व एकाला एस टी महामंडळामध्ये नोकरी देण्याचा कॅबिनेटमध्ये ठराव करण्यात आला, त्यावर तात्काळ त्याची अंमलबजावणी करा म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे यांच्याकडून निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा अनिल परब साहेब यांना निवेदन दिले , मा अनिल परब यांनी तात्काळ आज एस टी महामंडळाची बैठक लावली आहे त्या बैठकीमध्ये त्यांनी तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आदेश दिलेले आहेत, 12 ऑगस्ट रोजी कॅबिनेट मध्ये ठराव झालेला आहे त्याप्रमाणे मराठा आरक्षण दरम्यान शहीद झालेल्या कुटुंबातील प्रत्येकाला नोकरी वरती घेण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असं अनिलजी परब यांनी सांगितलं अशी माहीती डोंगरे यांनी दिली. 

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE