पाऊस आला एक बळी घेऊ गेला ; जनावरे चारायला गेलेला शेतकरी वीज पडुन मयत
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात पाऊस आला आणि एक जीव घेऊन गेला अशी घटना घडली आहे. मागील दोन महिन्यापासून पावसाचा पत्ता नव्हता व आज पाऊस नावापुरता बरसला पण जाता जाता मोरवड येथील एका वृद्धाचा जीव घेऊन गेला. एकीकडे लोकांना पाऊस पडल्याचा दिलासा मिळाला तर मोरवड गावावर शोककळा पसरवून गेला आहे.

मोरवड येथे जनावरे चारण्यासाठी घेऊन गेलेले अंबादास काळे वय 60 यांच्या अंगावर वीज पडून ते मयत झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. आज दुपारी झालेल्या पावसात सदरचा प्रकार घडला आहे.
