केतुर नंबर 2 येथे कोविड च्या दुसऱ्या लसीकरणाच्या कॅम्प तातडीने उपलब्ध करून द्यावा
करमाळा – संजय साखरे
करमाळा तालुक्यातील केतुर नंबर 2 येथे कोविड च्या दुसऱ्या लसीकरणाच्या कॅम्प तातडीने उपलब्ध करून द्यावा ,अशी मागणी करमाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नुतून उपाध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पाटील यांनी करमाळा तालुक्याचे आमदार श्री संजय मामा शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात असेही त्यांनी म्हटले आहे. केतुर नंबर 2 येथे कोविड लसीकरणाचा पहिला कॅम्प पाच मे २०२१ रोजी घेण्यात आला होता. याला 28 जुलै रोजी 84 दिवस पूर्ण झाले आहेत. याद्वारे या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. हे सर्व नागरिक वयोवृद्ध असल्याने त्यांना कोर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणे जिकिरीचे आणि मुश्कील आहे. त्यामुळे या नागरिकांसाठी कोविड लसीकरणाचा दुसरा कॅम्प केत्तुर येथे उपलब्ध करून देण्यात यावा अशी आग्रही मागणी त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.