डॉक्टर दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी ; मृत रुग्णाच्या बिलाचे पैसे कोविड सेंटरला
करमाळा – संजय साखरे
राजुरी तालुका करमाळा येथे ग्रामपंचायतीच्या 15 वा वित्त आयोग व लोकसहभागातून कोविड सेंटरचे उद्घाटन करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री श्रीकांत खरात यांच्या हस्ते करण्यात आले.

गावातील नामदेव बाबू दुरंदे व त्यांच्या भगिनी सौ शोभा बागल यांचे मागील आठवड्यात कोरोनामुळे दुःखद निधन झाले. ते सुरुवातीला कोर्टी येथील डॉक्टर अमोल दुरंदे व डॉक्टर विद्या दुरंदे यांच्या राजेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते .परंतु प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बारामती येथे हलवण्यात आले. परंतु बारामती येथील दवाखान्यात उपचार घेत असताना त्यांचे दुःखद निधन झाले.
याच दरम्यान स्वर्गीय नामदेव दुरंदे यांचे बंधू श्री नवनाथ दुरंदे यांनी डॉक्टर अमोल दुरंदे यांच्याकडे रुग्णांच्या बिलाबाबत विचारणा केली असता, डॉक्टर अमोल दूरंडे यांनी तुमचे सर्व बिल माफ केले असून तुम्ही बिलाची रक्कम गावातील कोविड सेंटरला मदत निधी म्हणून द्या असा पर्याय सुचवला .नवनाथ दूरंडे यांनी लागलीच त्याला होकार दिला व स्वर्गीय नामदेव दूरंडे व स्वर्गीय शोभा बागल यांच्या स्मरणार्थ 34 हजार रुपयांचा चेक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नावे सुपूर्त केला.

दरम्यान राजुरी येथे 30 बेडच्या सुरु झालेल्या कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरू असून राजुरी येथील अमेरिका येथे नोकरीनिमित्त स्थायिक झालेले श्री संतोष रावसाहेब सारंगकर यांनी ७५ रॅपिड अँटीजन किट दिले आहेत. राजुरी येथील कोविड सेंटर मध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांवर डॉक्टर अमोल दुरंदे, डॉ.विद्या दूरंडे,डॉ पापा मनेरी व ड्रा रुकसणा मनेरी हे उपचार करत आहेत.