करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

घिरट्या घालणाऱ्या ड्रोन ची दहशत ; संशयातुन चौघांना मारहाण – संबंधित विभागाचे दुर्लक्ष

करमाळा समाचार 

सध्या तालुक्यात विविध भागात ड्रोन घिरट्या घालत असल्यामुळे रात्रीच्या वेळी चोरटे ड्रोन माध्यमातून पाहणी करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तर नेमके काय प्रकरण आहे हे अद्याप पोलीस यंत्रणेलाही कळलेले नाही. तर या चर्चांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होऊन लोकांनीही आपल्या भागात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. त्यातच पांडे येथे तीन ते चार जणांना ड्रोन चालवणारे म्हणून मारहाण करण्यात आली आहे असे प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने वेळीच लक्ष घक्ष गरजेचे आहे.

मागील बरेच दिवसांपासून सदरचे ड्रोन उजनी पट्ट्यात दिसून येत होते. त्या भागातील घरांवर रात्री घिरट्या घालत असल्यामुळे लोकांनी संशय व्यक्त केला होता. परंतु त्याच्या माध्यमातून कोणती चोरी होत असावी किंवा होईल अशी घटना घडलेली दिसून आली नाही. त्यामुळे त्याकडे इतके गांभीर्याने कोणीच लक्ष दिले नाही. परंतु ड्रोन सारखे माध्यम हवेत उडवत असताना त्याची रीतसर परवानगी घेणे गरजेचे असते. ज्या भागात सदरचे ड्रोन उडवले जाते त्या भागातील संबंधित प्रशासनाला याबाबत कळवावे लागते. परंतु अद्याप अशी कोणतीही परवानगी नसल्याने सूचना करमाळा तालुकाच नव्हे तर जिल्हाभरात कुठेही आली नसल्याचे दिसून येत आहे.

politics

त्यामुळे सदरचे ड्रोन हवेत कोणाच्या परवानगीने उडवले जात आहेत आणि परवानगीच नसेल तर त्याचा शोध का घेतला जात नाही हा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. सदरच्या ड्रोनमुळे गावोगावी मोठी भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरुवातीला उजनी परिसरात सदरचे ड्रोन हवेत उडताना दिसत होते. तर आता ते करमाळा शहर व पांडे, वडगाव, मांगी, रावगाव या भागातही घिरट्या घालताना दिसत आहेत. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ड्रोनच्या माध्यमातून चोरी होईल या भीतीने लोक रात्रीची गस्त घालू लागले आहेत.

चौघांना मारहाण …
समाज माध्यमातून होणाऱ्या चर्चामुळे रात्रीच्या वेळी गावात आलेल्या चार जणांना फटका बसल्याचे दिसुन आले. दोन दिवसापूर्वी पांडे गावात ड्रोन फिरताना दिसले व काही जण रात्रीच्या अंधारात जाताना दिसले त्यांनी ड्रोन च्या माध्यमातून रेकी करत असल्याचा संशय गावकऱ्यांना आला व त्यांच्यावर संपुर्ण गाव तुटुन पडले यामुळे त्यावेळी त्यांना मारहाणही करण्यात आली होती. तर पांडे सारख्या भागात रात्री नऊ वाजता हा प्रकार घडत असेल तर या ड्रोन ची भिती लोकांमध्ये किती आहे दिसुन येते. तर काही दिवसांपुर्वी हे ड्रोन नसुन बारामती येथील ट्रेनी जेट असल्याचेही सांगण्यात आले पण हवेत उडणारे ट्रेनी जेट वाटत नसल्याने लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही.

साहेब म्हणाले ..
बरेच दिवसांपासुन सदरचे ड्रोन आपल्या भागात फिरत आहेत हे दिसुन आले आहे. यासंदर्भात तज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. नेमके हे ट्रेनी जेट आहेत का ? चोरी करण्यासाठी रेकी केली जात आहे याची माहीती घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. याशिवाय दहशतवादी पथकाला सुद्धा याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. लोकांनी कोणावर संशय असल्यास पोलिसांना कळवावे.
अजित पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी , करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE