तीन वर्षापुर्वी केलेली चोरी उघडकीस ; मुद्देमालासह चोरट्यांना अटक
करमाळा समाचार
तब्बल तीन वर्षापूर्वीच्या चोरीचा उलगडा करण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. केवळ उलगडाच नव्हे तर त्यावेळी चोरीस गेलेला मुद्देमाल ही संबंधित महिलेला माघारी मिळवून देण्यात पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. गुन्हे घडतात व आरोपी मोकाट फिरतात अशी समजूत असली तरी गुन्हा केव्हा ना केव्हा उघडकीस येतोच हाच प्रकार संबंधित चोरांच्या बाबतीत घडलेला दिसून आला आहे. तशाच प्रकारच्या चोऱ्या करण्यात हातखंडा असलेल्या या चोरट्यांना करमाळा पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. सदरची कामगिरी पोलिस निरिक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, १६ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शहरातील दत्तपेठ येथील महिला सरुबाई शिंदे वय ६० रा. मांगी या पायी जात असताना दोन अनोळखी इसम आले व त्यांनी गळ्यातील सोने काढून पिवळ्या रंगाच्या धातूचे बिस्किट दिले व गळ्यातील आठ ग्रॅम मोजण्याचे सोनेचे डोरले, दोन ग्रॅम वजनाची कानातली फुले असे एकूण वजनाचे काढून घेतले.

यावेळी गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर करमाळा पोलिसांनी तपास केला तपासात अहिल्यानगर जिल्ह्यात दोन पथके रवाना केली. यावेळी पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीतील भालगाव येथे संशयिताच्या घरावर पाळत ठेवून गणेश विनायक गायकवाड (वय ३५) या ताब्यात घेतले या प्रकरणी त्याने कबुली दिली असून त्याच्याकडून मुद्देमाल काढून घेतला आहे.
तर त्याच प्रकरणातील आरोपींकडे सन २०२२ मध्ये करमाळा शहरातील आयसीआयसीआय बँकेसमोर मालन रमेश काळे (वय ६५) रा. पोथरे यांच्या गळ्यातून एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने फसवून घेऊन गेले होते. तो मुद्देमालही याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. यावेळी दुसऱ्या पथकाने दुसरा संशयित आरोपी सोमनाथ निवृत्ती फुंदे (वय ४९) या ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस फौजदार दादासाहेब वाडगे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी हवालदार अजित उबाळे, पोलीस नाईक मनीष पवार, पोलीस नाईक वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर घोंगडे, सोमनाथ जगताप, गणेश शिंदे, अर्जुन गोसावी, तोफिक काझी, मिलिंद दहीहंडे, रविराज गटकुळ, अमोल रंधील, योगेश येवले तसेच सायबर पोलीस व्यंकटेश मोरे यांच्या पथकाने केली आहे.