करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विद्यापीठाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ; विद्यार्थ्यांचे नुकसान

करमाळा समाचार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या कारभारावर आता नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. पुढील सहाव्या सेमिस्टर चा निकाल लागला तरी पाचव्या सेमिस्टर चा निकाल व्यवस्थित न लागल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या प्रक्रियेत विद्यापीठाच्या चुका असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याचा निकाल विद्यार्थ्यांच्या हाती आला त्यात ते विद्यार्थी उत्तीर्णही झाले आहेत. परंतु तब्बल 72 विद्यार्थ्यांचा तिसऱ्या वर्षातील पाचव्या सेमिस्टरचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. तर सुरुवातीला दिलेला निकाल हा मागील निकालाच्या प्रमाणेच असल्याने विद्यार्थ्यांनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे निकाल दुरुस्त करण्याचे काम सुरु असल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडुन सांगण्यात येत आहे.

मागे झालेल्या पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षेमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून उत्तर पत्रिकेतील पाने फाडले असल्याचे तसेच परीक्षा क्रमांक चुकीचा टाकल्यामुळे निकाल व्यवस्थित लागत नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सर्वकाही व्यवस्थित केले आहे. त्यांचाही निकाल यामध्ये राखीव ठेवल्याने सर्वच विद्यार्थ्यांचा रोष विद्यापीठाने ओढवला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक व उत्तरपत्रिकेची पाने व्यवस्थित असतील अशांना निकाल तिला पाहिजे. परंतु त्यांनाही निकाल देण्यात येत नाही. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल हाती लागला. त्यांना मागील परीक्षेचे गुणपत्रकातील गुण पुन्हा आल्याने त्यांना तो निकाल मान्य नाही असे त्यांनी विद्यापीठाला कळवले आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांक मिळाले नाहीत…
विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांक मिळाले नसल्याने त्यांना पीआरएन हा क्रमांक टाकण्यासाठी सांगितले होते. मुळातच अशा पद्धतीच्या परीक्षा जाहीर होण्यापूर्वी विद्यापीठाने सर्व तयारी करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांक पासून ते निकाल लागेपर्यंत संपूर्ण तयारी करण्याची जबाबदारी ही विद्यापीठाची असते. त्यात झालेल्या चुका वेळीच दुरुस्त करून विद्यार्थ्यांना योग्य दिशेने येण्याची काम करण्याची सोडून विद्यार्थ्यांचा निकाल थांबून त्यांचे नुकसान केले जात आहे.

त्यात आमची काय चुक …
बऱ्याच विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेची पाने फाटलेली आहेत. तर काहींचे बैठक क्रमांक चुकलेले आहेत अशा लोकांचा निकाल राखून ठेवले आहेत. ज्यांच सर्व व्यवस्थित आहे त्यांचा निकाल देणे गरजेचे आहे. पण विद्यार्थ्यांना मागचेच निकाल देऊन पुन्हा एकदा वर्ष वाया घालवण्याचे काम केले जात आहे. याच्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात असून आत्महत्या सारखे विचार विद्यार्थ्यांच्या मनात येऊ लागल्या आहेत. यावर तोडगा न काढल्यास आम्ही मंगळवारी विद्यापीठाला विद्यापीठावर मोर्चा काढणार आहोत.
– सानिका लावंड, विद्यार्थीनी

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE