बार्शीत उपचार घेत असताना करमाळ्याच्या नगराध्यक्षाच्या खोलीत चोरी
करमाळा समाचार
करमाळ्याचे नगराध्यध्य वैभवराजे जगताप यांच्यावर बार्शी येथे उपचार सुरु असताना त्यांचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वैभव जगताप यांनी बार्शी पोलिसात तक्रार दिली आहे. दवाखान्यातील खाजगी रुम मधुन मोबाईल चोरीला जात असेल तर सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

दिनांक 06/04/2021रोजी पासुन जगताप हे सुश्रुत हस्पिटल अंधारे येथे कोविड 19 याचे उपचाराकरिता अँडमिट आहेत. त्यांच्यावर उपचार चालु होते. दिनांक10/04/2021 रोजी सकाळी 10/35 वा.चे सुमारास त्यांच्या हाताला सलाईन चालु असताना वैभव जगताप यांना सलाईनमुळे झोप आली होती.

त्यावेळी मोबाईल उशाला चार्जिंगला लावलेला होता. त्यावेळी जगताप यांना अचानक शेजारी असणारे व सिस्टर चा आवाज आल्याने जाग आली त्यावेळी उठुन बघितले असता एक इसम अंदाजे 35 ते 40वर्षे वयाचा इसम रुममधुन पळत जात असताना दिसला.
त्यावेळी जगताप यांच्या उशाला चार्जिंगला लावलेला मोबाईल पाहिला असता तो दिसुन आला नाही. त्यावेळी मी सिस्टर व इतर लोकांना विचारले असता वर नमुद वर्णनाचा एक इसम अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाचा याने माझ्या रुममधुन मोबाईल चोरुन नेला आहे. सदरचा रेड मी मोबाईल किंमत १५००० हजाराची चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे.