शासन स्तरावरून प्राप्त रेमडेसिविर इंजेक्शनचा कसलाही काळाबाजार झालेला नाही
करमाळा समाचार
शासन स्तरावरून प्राप्त रेमडेसिविर इंजेक्शनचा कसलाही काळाबाजार झालेला नाही. संबंधित इंजेक्शन हे राज्य शासनाच्या नियमानुसार विहीत प्रक्रिया पार पाडून रुग्णाला पुरवली जात आहे. तरी यासंबंधी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

दोन दिवसांमध्ये व्हायरल झालेल्या वृत्ताबाबत बोलताना तहसीलदार माने यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये दिलेल्या प्रेस नोट मध्ये ते म्हणाले की, सोशल मीडियावर बातमी व ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. त्यामध्ये उल्लेख केलेला रेमडीसिविर इंजेक्शनचा व शासनाचा प्राप्त रेमडीसिविर इंजेक्शन यांचा काहीही संबंध नाही.
सदर ऑडिओ क्लिप मधील डॉक्टर व संबंधित इसम यांचे संभाषण हे खाजगी रेमडीसिवीर इंजेक्शन बाबतचे असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा व तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती करमाळा यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत आहे. यात कोण दोषी आढळले तर दोषीवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
