करमाळासोलापूर जिल्हा

रेमडीसिवीर काळाबाजार प्रकरणात नवा खुलासा ! ; चौकशीनंतर बूमरँग शक्यता

प्रतिनिधी – करमाळा समाचार


सध्या करमाळा तालुक्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. याची कोणतीही शहानिशा न करता अनेक जण त्‍यावर काळाबाजार याचा ठपका ठेवून चौकशीची मागणी करत आहे. पण चौकशी झाल्यास नक्कीच यातून नेमके प्रकरण स्पष्ट होणार आहे अशी प्रतिक्रिया पंचायत समीती मधील “त्या” कर्मचाऱ्याने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पत्नी आजारी असताना अधिकची रेमडीसिवीर इंजेक्शन खरेदी केली होती. शिल्लक राहिलेली इंजेक्शन हे वाया जाण्यापेक्षा आहे त्या किमतीत एका डॉक्टरला दिली. त्यातील काही पैसे राहिल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी त्या डॉक्टरला पैशाची मागणी केलेली ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. वास्तविक पाहता सहा महिन्यापूर्वी झालेल्या व्यवहारासाठी आत्ता झालेल्या कॉल मुळे संशय निर्माण झाला आहे. आता सुरू असलेला चर्चेतुन काळा बाजार सुरु असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. पण मागील सहा महिण्यापुर्वी इंजेक्शनचा काळाबाजार तितकासा फावलेला नव्हता किंवा चर्चाही नव्हती. तरीही मागील झालेल्या व्यवहारातून आता हे प्रकरण पुन्हा एकदा उजेडात आले आहे व त्यातून काळाबाजार झाल्याची चर्चा होत आहे.

सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर तसेच पंचायत समिती कर्मचाऱ्याला आणि त्यांनी टारगेट केलेल्या दिसून येत आहे. तर या संदर्भात अधिकार्‍यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. खर तर चौकशी झाल्यानंतर आपसूकच यातील खरी कहाणी समोर येणार आहे. इंजेक्शनचा व्यवहार डॉक्टर व पंचायत समिती येथील कर्मचाऱ्यांचा झाला असे दिसून येत असले तरी पंचायत समितीकडे कसल्याही प्रकारचे इंजेक्शन येतच नसताना त्याचा व्यवहार पंचायत समितीच्या नावाखाली होऊ कसा शकतो ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यातून पंचायत समितीसह खाजगी डॉक्टर व संबंधित कुटुंबाचीही बदनामी होत आहे.

माझ्याकडे कागदोपत्री पुरावे …
पत्नी आजारी असताना त्यावेळी खरेदी केलेले अधिकृत पावत्या तसेच सर्व बिले आमच्याकडे असून यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावाही सुरू आहे. आम्ही कोणतेही अवैधरित्या काळाबाजार करून इंजेक्शन विकलेले नाही. ज्या किमतीत इंजेक्शन घेतले त्याच किंमतीत दिले आहेत. त्यातील काही रक्कम राहिल्याने संपर्क केलेली क्लिप व्हायरल झाल्याने हा वाद उद्भवला आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत.
– पंचायत समीती कर्मचारी.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE