पोलिसाच्या घरावरच चोरांचा डल्ला ; अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल
करमाळा समाचार
पोलिसाच्या बंद घराचे कुलुप कोयंडा तोडुन संमती शिवाय घरात प्रवेश करून घरातील संसार उपयोगी साहित्य स्वताचे फायदयाकरीता चोरून घेवुन गेला आहे. याप्रकरणी रमेश संपत पानसरे (मुंबई पोलीस ) सध्या रा. कुंभारगाव ता. करमाळा जि. सोलापुर यांनी तक्रार दिली आहे.

दि.01/06/2021 रोजी सकाळी 10/00 ते दि. 13/07/2021 रोजीचे सायंकाळी 06/15 वा चे दरम्यान पोलिसाच्या गैरहजेरीत त्यांच्या कुंभारगाव येथील राहते घरातुन घरगुती वस्तु चोरीला गेल्या आहेत.

त्यामध्ये 5000/- रू चे एक कुकर, सिंगर कंपनीचा हिरव्या रंगाचा मिक्सर, भारत गॅस कंपनीची लाल रंगाची लोखंडी सिलेंडर टाकी, भारत गॅस स्टीलची शेगडी , स्टो , दोन स्टीलच्या बादल्या, जर्मनची भांडी त्यावर संपत नरहरी पानसरे असे नाव कोरलेले , दहा पितळीची भांडी त्यावरही संपत नरहरी पानसरे असे नाव कोरलेले , देव , आठ स्टिलचे डबे त्यावरही संपत नरहरी पानसरे असे नाव कोरलेले , चार जर्मनचे डबे त्यावरही संपत नरहरी पानसरे असे नाव कोरलेले, तीन कढई, सहा जर्मनची पातीले त्यावरही संपत नरहरी पानसरे असे नाव कोरलेले अशा वस्तु चोरीस गेल्या आहे.