मजुरी करुन शिकले आज आहेत पोलिस निरिक्षक ; झोपडपट्टी राहणाऱ्या मुलाची जिद्द
जामखेड प्रतिनिधी
सुरेश नरहर गोसावी रा. आरोळे वस्ती ,जामखेड मधे घरची परिस्तिथी हलाकीची असल्यामुळे मजुरी करुण जे मिळेल ते काम करुण १२ वी मध्ये शिक्षण घेतले. त्या नंतर २ वर्ष भेंड़ा फैक्टरी इथे २ वर्षाचा वेटरनरी चा कोर्स केला. या डिप्लोमावर बी एस एफ (बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स) १ जनवरी २००६ मधे सिलेक्शन झाले. नंतर २०१४ मधे सब ईन्स्पेक्टर (PSI) या पोस्ट वरती प्रमोशन झाले आणि आता डिसेम्बर २०२० मधे निरीक्षक (PI) या पदावर प्रमोशन झाले.

पंजाब मधे पोस्टेड आहेत. घरची परिस्तिथी खुप गरीब असताना इथ पर्यन्त पोहचले आहे. त्यामुळे माझे सर्वाना सांगणे आहे कि परिस्तिथी कशीही असो शिक्षण सोडु नये व प्रयत्न करत राहावे. यश नक्की मिळेल शिक्षण घेत आसताना नौकरी लागताना ज्यांनी ज्यांनी मदत केली व प्रमोशन झाल्या मुळे मला शुभेच्छा रूपी प्रेम दिल त्या बद्दल सर्व वरिष्ठ व सहकारी मित्र माझा स्टाफ नातेवाईक यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद असे निरीक्षक सुरेश गोसावी म्हणाले.

निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल जामखेड ते सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, नगर अध्यक्ष निखिल घायतडक , सोमनाथ गिरी, मनोज खेडकर , संदिप खेडकर , शिवजी लटपटे, प्रमोद राऊत , मनोज बन, विजय राजकर ,सागर सदाफुले , सोमनाथ बोराटे, संतोष गिरी , अभिजित लोहकरे , यासीनभाई शेख आदींनी अभिनंदन केले.