कडक निर्बधाला व्यापाऱ्यांचा विरोध ; करमाळ्यात बैठकीचे आयोजन
करमाळा समाचार
मागील दोन वर्षांपासून व्यापारी तसेच छोट्या दुकानदारांचे कंबरडे मोडलेले आहे. व्यवसाय व व्यापार सुरळीत होत असतानाच वारंवार कोवीडच्या प्रादुर्भावामुळे व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिथीलता तर करमाळ्यासह इतर पाच तालुक्यात कडक निर्बंध हे स्थानिक व्यापाऱ्यांच्या मुळावर असल्याचे दिसून येते त्यामुळे याबाबत मंगळवारी बैठक घेऊन सदर निर्बधाला सर्व व्यापारी संघटनांचा विरोध दर्शवणार असल्याची माहिती होटेल असोसिएशन तथा व्यापारी संघटनेचे जगदीश अग्रवाल यांनी दिली आहे.

यासंदर्भात करमाळा हॉटेल असोसिएशन व्यापारी असोसिएशन व इतर प्रमुख संघटनांचा मंगळवारी बैठकीचे आयोजन केले आहे. सदर बैठकीत सर्व व्यापाऱ्यांची मते जाणून पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. वारंवारच्या बंद ला व्यापारी वैतागलेले असून सद्यपरिस्थितीत रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येत नाही. शिवाय इतर तालुक्यांत प्रमाणे वेळेची बंधने घातल्यास स्थानिक व्यापारी मान्य करण्यास तयार आहेत. परंतु केवळ करमाळा व इतर चार तालुक्यांवर पूर्णवेळ संचार बंदी लादणे चुकीचे आहे असे मत अगरवाल यांनी व्यक्त केले. त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सदरची बैठक मंगळवारी आयोजीत केली आहे.
