करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

छत्रपती चषकावर जेऊरच्या गजराजचा झेंडा ; करमाळ्याचा शिवक्रांती उपविजेता

करमाळा – नाना घोलप

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये अत्यंत चुरशीच्या सामन्यात जेऊर येथील गजराज संघाने बाजी मारली असून करमाळ्याच्या शिवक्रांती संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. अतिशय अतितटीच्या सामन्यात जेऊरच्या गजराज संघाने केवळ चार धावांवर विजय मिळवला आहे. सदर स्पर्धेचे गजराज जेऊर संघाने आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन खटके यांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न झाले.

जेऊर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सदरच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यासह बाहेरील तालुक्यातील ही संघांचा भरणा मोठ्या प्रमाणावर झाला होता. यामध्ये कुर्डूवाडी, भिगवण सह २४ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांकाचे ७१ हजाराचे बक्षीस गजराज, द्वितीय ५१ हजार शिवक्रांती करमाळा, ३१ हजार तृतीय केम तर चतुर्थ पारितोषिक २१ हजार भिगवणच्या संघाला मिळाले आहे.

politics
शिवक्रांती
शिवक्रांती

अंतिम सामन्यात मोनु गुप्ता याची झुंजार खेळी अपयशी ठरली. तर आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करणाऱ्या राहुल घोरपडेने आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवले. अंतिम शतकात विजयासाठी सहा चेंडू १८ धावांची गरज असताना राहुल घोरपडे याची गोलंदाजी च्या जोरावर गजराज संघाने सदरचा सामना चार धावांनी विजयी केला आहे.

मालिकेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४४ वर्षीय रामदास राऊत यांना मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार देत एलईडी टीव्ही, मॅन ऑफ द मॅच राहुल घोरपडे, उत्कृष्ट गोलंदाज शरद वाघमोडे , उत्कृष्ट फलंदाज म्हणून महेश तोरमल यांची वर्णी लागली. सदरच्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, राजाभाऊ जगताप, संभाजी ब्रिगेड प्रदेशचे नितीन खटके, आबा झाडे, सचिन साळुंखे, विनय ननवरे, सतीश फंड आदीसह मान्यवर व खेळाडू उपस्थित होते. सदर सामन्यांचे समालोचक आनंद भांगे, शाहरुख पठाण व महेश तोरमल यांनी केले. सदरच्या स्पर्धा पार पाडण्यासाठी एनसीसी जेऊर, डीसीसी दहिगाव, क्रांतिवीर कुंभेज, मोरया ११ वांगी क्रमांक दोन यांचं सहकार्य लाभले. तर गजराज प्रतिष्ठानच्या आजी-माजी सदस्यांनी परिश्रम घेतले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE