जिल्ह्यातील बारा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; बार्शीचे प्रभारी अधिकारी म्हणून जगदाळेंची नेमणुक
करमाळा समाचार
जिल्ह्यातील बारा पोलीस अधिकाऱ्यांच्या नव्या ठिकाणी नेमणुका करण्यात आल्या आहेत. यामध्ये करमाळ्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एन जगदाळे यांची बार्शी तालुका प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आता बार्शी तालुका पोलीस ठाणे जगदाळे हे पाहतील.

लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात काही बदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

जगदाळे यांनी यापुर्वी पंढरपूर येथे काम केले आहे. त्यानंतर करमाळा येथेही त्यांचे काम उत्तम राहिले आहे. गडचिरोली येथे काम केल्या नंतर त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह, खडतर सेवा पदक व विशेष सेवा पदक जगदाळे यांना मिळाले आहे.