माने यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
करमाळा समाचार
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेचे अध्यक्ष, भटक्या जमाती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा. रामकृष्णजी मानेसाहेब ( भाऊ) यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त युवा एकलव्य प्रतिष्ठान, एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा यांच्या वतीने आज तीस ऑगस्टला एकलव्य आश्रमशाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी एकलव्य आश्रमशाळा येथे साठ वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. समाज कल्याण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी गोपाळराव सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. बाबुराव हिरडे हे अध्यक्षस्थानी होते. तर डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील, प्रा. नागेश माने, प्रा. अभिमन्यू माने, माजी नगराध्यक्ष दीपकराव ओहोळ, माजी नगराध्यक्ष वैभव जगताप, माजी उपनगराध्यक्ष अहमदचाचा कुरेशी, डॉ. श्रीराम परदेशी, पत्रकार विवेकराव येवले, भारत जाधव वस्ताद, सचिनजी साखरे, बाळासाहेब गोरे गुरुजी, विजय देशपांडे, पोलीस अधिकारी बिभीषण जाधव साहेब,

पत्रकार अशपाक सय्यद, शकीलभाई बागवान, उद्योजक कुलकर्णी काका, शिक्षक बापूराव भगत, युवा नेते धनंजय शिंदे, वृक्षमित्र काकासाहेब काकडे, अरुणराव माने, सोपानभाऊ माने, धनंजय माने, शिवाजीराव माने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब झिंझाडे सर, प्रा. कोळेकर सर आदि उपस्थित होते. त्यांच्यासह मा. भाऊ, वहिनी, ऍड. संग्रामदादा आणि एकलव्य परिवारातील सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांचे आभार ऍड. संग्रामदादा माने यांनी मानले.