करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शालेय ज़िल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळा चे घवघवित यश

करमाळा –

आज दिनांक 6-10-24 रविवार रोजी सोलापूर क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय सोलापूर ज़िल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा जेऊर येथे पार पडल्या. या स्पर्धेत त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळा च्या खेळाडूंनी मल्लखांब ची विविध प्रत्याक्षिके चांगल्या प्रकारे करुन स्पर्धेत मल्लखांब घवघवित यश संपादन केले.

चौदा वर्षा खालील मुलांच्या गटात प्रतिराज दादासाहेब शिंदे प्रथम व रणवीर सचिन चेंडगे चतुर्थ क्रमांक तर जयराज सचिन दळवे याने पाचवा तसेच मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक संस्कृती दीपक पाटूळे तर चतुर्थ क्रमांक संस्कृती साळुंखे व पाचवा सार्थिका शिंदे तसेंच सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात आदित्य ललित शिंदे ने त्रितिय क्रमांक मिळवला.

politics

मुलींच्या गटात त्रितीय क्रमांक आदिती चांदगुडे व चतुर्थ क्रमांक राजलक्ष्मी सुतार तर पाचवा क्रमांक साक्षी खुळे सहावा क्रमांक संचिता अटूळे ने मिळवला तसेंच 19 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मछिंद्र लोंढे व द्वितीय क्रमांक अनिकेत करे व चतुर्थ क्रमांक प्रणव विटकर तर मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक संयुक्ता सोनके त्रितिय क्रमांक सूष्टी चांदगुडे तर चतुर्थ क्रमांक श्रावणी कोहले ने मिळवला.

वरील सर्व मल्लखांब खेळाडूची विभागीय स्तर शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली. विजयी खेळाडुंचे अभिनंदन त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळा चे सचिवा निशा लखन शिरस्कर,तसेंच लखन शिरस्कर ( पुणे ग्रामीण पोलीस-शिक्रापूर ) अतुल शिरस्कर (SRPF पोलीस-दौंड ) यांनी फोन वरून विजयी खेळाडूंनचे अभिनंदन केले व क्लब चे आधारस्तंभ ललित शिंदे साहेब ( करमाळा पोलीस स्टेशन )पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विजयी खेळाडूंनच्या या यशामागे त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळा चे मुख्य प्रशिक्षक सागर शिरस्कर सर यांचे रोज मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच क्लब चे जुनिअर कोच साक्षी खुळे, संयुक्ता सोनके, गोरक्ष लोंढे यांचे तालुका क्रीडा संकुल करमाळा येथे रोज संध्याकाळी 3,4 तास सराव घेण्यात मोलाचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेदरम्यान करमाळा शहर मधील नामवंत क्रीडा शिक्षक सचिन दळवे सर ,रामकुमार काळे सर,जितेश कांबळे सर, अंकुश थोरात सर तसेंच त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळा च्या सर्व पालक वर्ग, हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ज़िल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत सोलापूर ज़िल्हातुन विविध शाळातुन जवळपास 150 ते 200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. वरील विजयी मल्लखांब खेळाडूंचे विविध स्तरावरून करमाळा शहर मधून तसेंच तालुक्यातुन अभिनंदन होतं आहे व शुभेच्छा मिळत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE