तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली ; नागपूर नंतर पाच महिण्यात दुसऱ्यांदा बदलीचे आदेश
करमाळा समाचार
नागपूर महापालिकेत विरोधामुळे बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण काही दिवसातच सरकारने त्यांच्या बदलीचा आदेश रद्द केला होता. तेव्हापासून तुकाराम मुंढे हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत. मुंढे यांची राज्याच्या मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरू केला होता. यामुळे त्यांचा महापौर आणि भाजपच्या इतर नगरसेवकांशी संघर्ष सुरू झाला होता.
