E-Paperसोलापूर जिल्हा

दत्तकला शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी – प्रा.प्रविण अंबोधरे

दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चिंचोली भिगवण या संस्थेचा १५ वा वर्धापनदिन रविवार ८ डिसेंबर २०२१ रोजी संस्थेच्या आभियांञिकी विभागाच्या सेमिनार हाॅलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर संस्थेच्या सचिवा प्रा.माया झोळ डायरेक्टर डाॅ.शरद कर्णे सर, इंजिनिअरिंग विभागाचे प्राचार्य केस्ते सर फार्मसी विभागाचे संचालक डॉ.अमोल कुलकर्णी सर, प्राचार्य डॉ.सुनिल हरेर सर, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.विशाल बाबर सर, स्कुल डायरेक्टर ताटे मॅडम, प्राचार्या यादव मॅडम, भिगवण पञकार संघाचे अध्यक्ष प्रशांत चौरे सर्व विभागांचे विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती पुजन करुन करण्यात आली त्यानंतर सर्व विभागामार्फत प्रा.झोळ सर व प्रा.झोळ मॅडम यांचा सत्कार करण्यात आला व केक कापुन संस्थेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. संस्थेच्या वर्धापनदिन दिनाचे औचित्य साधून संस्थेमधिल विविध विभागातील ज्या कर्मचारी वर्गाने उच्च शिक्षण संपादन केले आहे. त्यांचा सन्मान प्रशस्त पञ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. यानंतर डाॅ.हरेर सर, सौ.ताटे मॅडम व चौरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना प्रा.माया झोळ म्हणाल्या कि, संस्थेची सुरुवात होत असताना संस्थेमध्ये १२५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. आज यावर्षी तो आकडा ३५०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला आहे. संस्थेची वाटचाल होत असताना सर्वांचे सहकार्य लाभले.
त्यानंतर अध्यक्षिय भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रा.झोळ सर म्हणाले कि, या संस्थेची वाटचाल होत असताना कामगारांपासुन ते विद्यार्थी शिक्षकांपर्यंत मदत होत असते. तसेच सर्वांचे आभार मानले व सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी पदि डॉ.विशाल बाबर सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे प्रा.झोळ सर यांनी सांगितले व त्यांच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.बाबर सर व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रा.खाडे मॅडम यांनी केले आभारप्रदर्शन माने मॅडम यांनी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE