करमाळा तालुक्यातील तुषार शिंदेचे यूपीएससी परिक्षेत यश
करमाळा समाचार
यु पी एस सी (upsc) परिक्षेचा निकाल लागला असून यामध्ये पुन्हा एकदा करमाळ्यातील एक नाव चमकले आहे. काही दिवसांपुर्वी शुभांगी केकान हिने यूपीएससी मध्ये या संपादन केले होते. तर आता नुकत्याच लागलेल्या निकालात कंदर येथील तुषार श्रीहरी शिंदे (tushar shinde) यांनी देशात 36 व्या क्रमांकाने यश मिळवले आहे.

कंदर ता करमाळा येथील तुषार श्रीहरी शिंदे याची यूपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस(IAS) या परीक्षेत देशात 36 वी रँक घेऊन निवड झाली आहे. कंदर येथील तो पहिलाच IAS आधिकारी बनला आहे. त्याचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.
त्याचे प्राथमिक शिक्षण गावात झाले.

पुढे इंजिनिअरिंग केल्यानंतर स्पर्धा परीक्षा अभ्यासाची आवड निर्माण झाल्याने त्याने अभ्यासाला सुरुवात केली. अनंत अडचणींवर मात करत त्याने हे यश मिळवले आहे. आई-वडील यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज तुषारने केले आहे.गावात सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.