जास्तीच्या बीलाच्या तक्रारीनंतर दोन रुग्णालयाची होणार तपासणी ; सभापती गहिनीनाथ ननवरे यांच्या तक्रारीची दखल
करमाळा समाचार
कोरोना काळात पवार व शहा दोन हॉस्पिटल कोरोना रुग्णांकडून अतिशय अव्वाचे सव्वा दर लावून रुग्णांची आर्थिक फसवणूक करीत आहे असून त्यांची फसवणूक केली जात आहे. सदर हॉस्पिटल चे बिलाचे ऱी ऑडिट होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर भारत वाघमारे यांनी संबंधित प्रकरणाची व हॉस्पिटलमधील कोविड रुग्णाच्या बिलाची ऑडिट करण्याच्या सूचना देत सदर ऑडिटमध्ये बीलात लावलेले दर हे नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित हॉस्पिटलवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा सूचना उपविभागीय अधिकारी यांना दिल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून करमाळा तालुक्यात कोरोना रुग्णांकडून कोविड हॉस्पिटल मध्ये आधिक बिल देणे. तसेच अनेक रुग्णांना पैसे घेऊनही बील दिले जात नसल्याच्या तक्रारी येत होत्या. या अनुषंगाने करमाळ्याचे पंचायत समिती सभापती ननवरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून संबंधित हॉस्पिटलचे ऑडिट करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

यामुळे आता रुग्णांना नक्कीच दिलासा मिळेल रुग्णांची पिळवणूक थांबेल व ओरिजनल बिल दिल्यास नेमके किती बिल होते हे रुग्णांनाही कळणार आहे. त्यामुळे रुग्णांनी मूळ बिलाची मागणी करणे गरजेचे आहे हॉस्पिटल बिल देत नसतील तर तहसीलदार समीर माने यांच्याकडे तक्रार करावी.