उपसरपंच पदी बागल गटाच्या गावडे यांची बिनविरोध निवड
करमाळा –
कुगाव तालुका करमाळा येथील ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंच पदी बागल गटाच्या श्रीमती विजया उद्धव गावडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेना जिल्हा युवा नेते व मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल व महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली कुगाव गावाच्या प्रगतीसाठी विकासासाठी आम्ही निश्चित योगदान देऊ याची ग्वाही श्रीमती गावडे यांनी यावेळी दिली.
या निवडीचे वेळी आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे, विद्यमान सरपंच सुवर्णाताई पोरे, उपसरपंच प्रकाश डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश बोंद्रे, विजय कोकाटे, अर्जुन अवघडे, संदिपान कामटे, मन्सूर सय्यद, नवनाथ अवघडे, कैलास बोंद्रे, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, मार्केट कमिटीचे संचालक महादेव कामटे, माजी उपसरपंच इनुस सय्यद, पोलीस पाटील जालिंदर हराळे, सागर पोरे, सचिन गावडे तसेच ग्रामसेवक श्रीकांत बारकुंड, आबासाहेब डोंगरे व शहाबुद्दीन सय्यद उपस्थित होते.