E-Paperक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

नदी पात्रातुन अवैधरित्या वाळु चोरुन वाहतुक करताना एकाला ट्रकसह पकडले

समाचार टीम –

भीमा नदीतील पात्रातील वाळू चोरी करून वाहतूक करीत असताना एका व्यक्तीस टाकळी ते भिगवन जाणाऱ्या रस्त्यावर कोंढार चिंचोली भागातून जात असताना पोलिसांनी पकडले आहे. त्याच्या कडुन तीन ब्रास वाळु व ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मागील काही दिवसापासून चोरुन वाळु नेली जात असल्याबाबत माहीती पोलिसांना मिळाली त्यानंतर ही कारवाई केली आहे.

करमाळा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या वेळी टाकळी ते भिगवण रस्त्यावर हा वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी एक पथक त्या दिशेने रवाना केले. यावेळी त्या ठिकाणी एक ट्रक येताना दिसला व त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सहा ऑगस्ट रोजी पहाटे चारच्या सुमारास कोंढार चिंचोली तालुका करमाळा गावचे हद्दीत टाकळी ते भिगवण जाणारा रोडवर कोंढार चिंचोली गावात जाणाऱ्या चौकात झालं सतीश मंजुळे राहणार केतुर क्रमांक दोन तालुका करमाळा याच्या सहा चाकी ट्रक मध्ये सुमारे तीन ब्रास वाळू ही मलठण जिल्हा पुणे येथून भीमा नदीच्या पात्रातून चोरून आणली होती.

बेकायदेशीर ऱित्या विनापरवाना वाहतूक करत असताना त्याला करमाळा पोलिसांनी पकडले. सदरची कारवाई पोलिस हवालदार मारुती रणदिवे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप व सिद्धेश्वर लोंढे यांनी केली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE