गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये सीबीएससी विभागा ख्रिसमस डे चे अनोखे सेलिब्रेशन
करमाळा समाचार

24 डिसेंबर रोजी ख्रिसमस डे रेड डे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मेरी ख्रिसमस ( ख्रिसमस डे ) या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव सौ. रेश्मा भोगे मॅडम यांची उपस्थिती लाभली. झिगल बेल झिगल बेल या नर्सरीच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. येशू ख्रिस्तांच्या जीवनाची गाथा विद्यार्थ्यांना सांगून त्यांची प्रार्थना घेतली केरळच्या मॅडम यांनी मल्याळम भाषेतील येशू ख्रिस्ताची प्रार्थना गायली तसेच चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावून जशी प्रार्थना करतो त्या पद्धतीने आज वर्ग मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मेणबत्ती लावून प्रार्थना करून ख्रिसमस साजरा केला.

ही संकल्पना सौ रेश्मा भोगे मॅम मांडली मुलांना चर्च मधील वातावरण, प्रार्थना करण्याची पद्धत या गोष्टी समजाव्यात उद्देश समोर येतो ख्रिसमस डे या कार्यक्रमातून मुलांना सांगण्यात आहे एकमेकांची मदत केली पाहिजे देव माणसामध्ये आहे मनापासून देवाकडे प्रार्थना करा तर देव आपल्याला साथ देतो पण प्रयत्न आपणच करायचे असतात.रेड डे या कार्यक्रमात लाल रंगाचे महत्त्व सांगितले. व इयत्ता पहिलीच्या सानवी राक्षे, शौर्या वळेकर, स्वराली फुके, यशश्री भराटे, हर्षाली तपकीर, अनन्या पाटील, आराध्या कांबळे, शिफा मुलानी या विद्यार्थ्यांनी रक्तगटाची माहिती सांगितली यामध्ये कोणत्या प्रकारचे रक्तगट असतात कोणते रक्त कोणाला दान करू शकतो याबद्दल माहिती सांगितली.
नर्सरी व एल.के.जी च्या विद्यार्थ्यांनी प्रिंट मेकिंग व यु.के.जी च्या विद्यार्थ्यांनी ड्रॉइंग आणि कलरिंग ऍक्टिव्हिटी सादर केली.एकूण 105 विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला.येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्त केक कापून ख्रिसमस डे सेलिब्रेट करण्यात आला.या कार्यक्रमाची प्रस्तावना मेघा मॅम यांनी केली. रेड डे चे (लाल) महत्त्व कोमल गोरे मॅम यांनी सांगितले. या कार्यक्रमातून लाल रंग कुठे वापरला जातो कोणत्या अर्थाने वापरला जातो तो मूळ रंग आहे लाल रंगांची विविध फळे इत्यादी गोष्टींची माहिती मुलांना मिळाली.संस्थेच्या सचिव सौ.भोगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली HOD शिंदे मॅडम व पवार मॅडम, खान मॅम, क्षीरसागर मॅम यांनी कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.


