निवडणुक निकालानंतर चुगलीखोर ॲक्टीव्ह मोडवर ; आधुनिक नारद मुनी ओळखा
करमाळा समाचार – विशाल घोलप

नुकतीच करमाळा नगर परिषदेची निवडणूक पार पडली. यामध्ये जवळपास प्रमुख गटांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये सावंत गटाने शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली व जिंकली. पण आता त्यांच्या विजयानंतर तर्कवितर्क लढवले जात आहेत. याशिवाय समोरच्या गटातील वाद किंवा नेत्यानेत्यांमध्ये सुरू असलेला विसंवाद व त्यातून कार्यकर्त्यांमध्ये कशा पद्धतीने फूट पाडता येईल यासाठी चुगलीखोर ॲक्टीव्ह झाले आहेत. त्यांनी विविध माध्यमातून या नेत्यांनी त्या नेत्याने दुसऱ्यासाठी कसा खड्डा खांदला हे कानातून डोक्यात भरवत आहेत.

मुळातच करमाळा शहराचे राजकारण हे अद्याप कोणालाच कळले नाही. या ठिकाणी कधी कोणत्या गटाला व कधी कोणत्या नेत्याला मतदार संधी देतील याचं गणित मोठ मोठ्या नेत्यांना अद्याप समजलेलं नाही. सावंत गट हा मागील अनेक वर्षापासून काम करत असून त्यांनी जनतेशी असलेली आपली नाळ त्यांनी सोडलेली नाही. केवळ शहर मर्यादितच नव्हे तर ग्रामीण भागातही सावंत गटाचे प्रस्त मोठे आहे. केवळ अर्ध्या रात्री उठला आणि नेता झाला अशी परिस्थिती त्या गटाची नसून आजपर्यंत मोठी महत्त्वकांक्षा न ठेवता व सत्तेत असो किंवा नसो प्रत्येकाची कामे करण्यात सावंत गटांने हाती घेतलेली होती. त्याचाच फायदा या निवडणुकीत झालेला दिसून आला.
पण आता सदरची संपूर्ण परिस्थिती माहीत असतानाही पराभव झालेल्या गटांच्या कार्यकर्त्यांना दिशाहीन करून आपल्या गटात किंवा समोरच्या गटात कशा पद्धतीने खेचून घेता येईल किंवा संबंधित कार्यकर्त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं भरून त्यांच्या नेत्यांपर्यंत हा मेसेज पाठवण्याचे काम विविध चुगलीखोरांकडून होऊ लागल्याचं चित्र सध्या करमाळ्यात दिसून येत आहे. पहिले लढाया या समोरासमोर व मैदानात व्हायच्या पण आता हळूच कानात काहीतरी सांगितलं जातं आणि त्याची पडसाद तालुक्याच्या राजकारणावर करण्याची प्रयत्न सुरू आहेत. पण हे सगळं सुरू आहे ते फक्त कार्यकर्त्यांमध्ये याचं मुळात लोकांना तर घेणं देणं नाही. आणि नेतेही येवढे दुधखुळे राहिले नाहीत.

सदरच्या निवडणुकीत काहीजण देवींच्या पराभवाला बागल गटाची खेळी असल्याचे बोलत आहेत. तर काहींनी जगताप गटाच्या पराभवाला पाटील गटाला नावे ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच यात शिंदे तरी कुठे वाचलेत शिंदे गटालाही देवींना पाडून बागलांना बदनाम करायचं होतं असेही फुसकेबार सध्या गल्लीबोळात वाजू लागले आहेत. मुळातच अशा पद्धतीमुळे कोण कोणाच्या मनात काय भरते यापेक्षा ज्यांनी खरंच कामातून कमवले अशा सावंत गटाकडे मात्र दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. सावंत गटाने ज्या पद्धतीने सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम केले त्यांचे प्रश्न सोडवले ज्यावेळी करमाळ्याच्या जनतेला एका पर्यायाची गरज होती त्यावेळी पर्याय उभा करून दिला अशा सावंत गटाच्या कामातही कौतुक होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याकडे जर कोण अशी चुगलीबाज येत असतील तर त्यांना वेळीच ओळखुन त्यांचा डाव ओळखा.

