उमरड येथील जय भवानी तरूण मंडळ गणपती मंडळाचा अनोखा उपक्रम
करमाळा समाचार
गावामध्ये प्रत्येक वर्षी एक गाव एक गणपती ची परंपरा चालू आहे. उमरड येथील जय भवानी तरूण मंडळ मंडळाने यावर्षी कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व गावातील 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तरुण मंडळाने प्रत्येक रक्तदात्यास एक हेल्मेट भेट स्वरूपात दिले.

हे मंडळ गावांमध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक कार्य करत आहेत. रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी गावातील सचिन कोठावळे अण्णा पठाडे अरुण बदे मुकेश बदे शैलेश बदे गोवर्धन कोठावळे औदुंबर बदे परशुराम गायकवाड मनोज पठाडे बंकट बदे इत्यादी मंडळातील युवकांनी परिश्रम घेतलेया मंडळाचे तालुक्यातील विविध स्तरावर कौतुक होत आहे.
शिबिर आयोजित करण्यासाठी शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट करमाळा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.