करमाळासोलापूर जिल्हा

सैनिकांना देशकर्तव्य करताना जो मान मिळतो तोच मान त्यांना सेवानिवृत्तीनंतर सुद्धा प्रत्येक सरकारी कार्यालयात मिळावा

करमाळा समाचार सुनिल भोसले


करमाळा पंचायत समिती येथे जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत
” एक दिवस सैनिकांसाठी ” मुख्य कार्यकरी अधिकारी यांचेमार्गदर्शना खाली एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्या राणीताई वारे उपसभापती दत्तात्रय सरडे पंचायत समिती सदस्य अॅड राहुल सावंत,उप अभियंता जगदिश पाटील, प्रभारी गटशिक्षणाधिकारी अधिकारी , घरकुल विभागाचे वैभव माने, उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत आजी – माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय तसेच शहीद कुटुंबियांच्या तक्रारी , निवेदन, अर्जाचे निराकरण व अर्ज स्वीकारण्याची विशेष मोहीम राबविण्यात यावी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय सरडे बोलताना म्हणाले की, देशाची अविरत आणि अहोरात्र सेवा करणाऱ्या आजी माजी सैनिकांना सेवेत अथवा सेवानिवृत्तीनंतर कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालयात खेटे घालावे लागतात. मग यावेळी होणाऱ्या दफ्तर दिरंगाईचा आणि शासकीय नियमांचा अडसर होत असल्याने कामे प्रलंबित राहतात. त्यामुळे या देशसेवकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. तेव्हा या आजी माजी सैनिकांना देशकर्तव्य करताना जो मान मिळतो तोच मान त्यांना सेवानिवृत्तीनंतर सुद्धा प्रत्येक सरकारी कार्यालयात न्याय मिळावा त्यांना विविध सरकारी लाभाच्या योजनेत सैनिकांसाठी विशेष कक्ष स्थापन करून प्रत्येक लाभाच्या योजननेची अंमलबजावणी ‌व्हावी. सर्व योजना विनाअडथळा कश्या सोडवल्या जाव्यात कोणत्याही उत्पन्नाची अट त्यासाठी अडसर ठरू नये असे मत व्यक्त केले.

यावेळी तालुक्यातील आजी माजी सैनिक कोरोना महामारीमुळे प्रशासनाच्या नियमाचे पालन करून उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE