कावळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.अनुसया नवनाथ हाके यांची बिनविरोध निवड
दिलिप दंगाणे – जिंती
कावळवाडी (ता.करमाळा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.अनुसया नवनाथ हाके यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री बबन दत्तू कावळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते.

मंगळवार (ता.२ नोव्हेंबर) रोजी सकाळी नवीन उपसरपंचपदाच्या निवडीसंदर्भात येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी श्री. मकाई कारखान्याचे संचालक श्री रामभाऊ हाके पाटील व राष्ट्रीय समाज पक्षाचे अनिल शेजाळ यांच्या उपस्थितीत सौ.अनुसया नवनाथ हाके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री. मोतेकर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

सौ.अनुसया नवनाथ हाके या श्री. मकाई कारखान्याचे संचालक श्री रामभाऊ हाके पाटील यांच्या भाऊजई आहेत. बिनविरोध निवड झाले नंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सौ.अनुसया नवनाथ हाके यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.